परधाडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: June 30, 2016 00:51 IST2016-06-29T22:51:00+5:302016-06-30T00:51:51+5:30

परधाडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Death of a snake bite at Pardhadi | परधाडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

परधाडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील रात्री झोपेत असलेल्या तरुणास सर्पदंश झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील परधाडी येथील राजेंद्र मधुकर चौधरी (२८) आपल्या राहत्या घरी रात्री झोपले होते. दरम्यान, रात्री दोन ते तीनच्या सुमारास विषारी सापाने त्यांच्या मानेला दंश केला. दंश केल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांना त्वरित न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर चौधरी यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नांदगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of a snake bite at Pardhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.