कारच्या धडकेत गंभीर जखमी महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: May 20, 2017 01:28 IST2017-05-20T01:27:57+5:302017-05-20T01:28:32+5:30
नाशिक : कार मागे घेत असताना चालकाने केलेल्या दुर्लक्षामुळे दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या आशा देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

कारच्या धडकेत गंभीर जखमी महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कॅनडा कॉर्नरजवळ कार मागे घेत असताना चालकाने केलेल्या दुर्लक्षामुळे उभ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या चेतनानगरमधील देशमुख दाम्पत्यापैकी आशा श्रीराम देशमुख (वय ३८, रा़ अनंत अपार्टमेंट) यांचा शुक्रवारी (दि़१९) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
श्रीराम व आशा देशमुख हे कॅनडा कॉर्नर परिसरात गेले होते़ येथील सॅन कॉम्प्युटेक या दुकानाजवळ दुचाकीसह उभे असताना वॅगन आर कारचालकाने कार पाठीमागे घेत असताना दुचाकीस धडक दिली़ यामध्ये देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़