बिजोरसे येथे विजेच्या धक्क्याने शालेय मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: July 10, 2016 23:11 IST2016-07-10T23:06:46+5:302016-07-10T23:11:37+5:30

बिजोरसे येथे विजेच्या धक्क्याने शालेय मुलाचा मृत्यू

The death of the school boy by Bijourse electric shock | बिजोरसे येथे विजेच्या धक्क्याने शालेय मुलाचा मृत्यू

बिजोरसे येथे विजेच्या धक्क्याने शालेय मुलाचा मृत्यू


नामपूर : बागलाण तालुक्यातील बिजोरसे येथील आदिवासी समाजाचा प्रवीण भिवसन अहिरे (१५) हा मुलगा विजेचा धक्का लागून जागीच मरण पावला. शेतात मका पेरणीसाठी तो वडिलांना मदत करत होता. पेरणी आटोपल्यावर शेतातील बांधावर लोखंडी नांगर ठेवत असताना बांधावरील इलेक्ट्रिक खांबाला स्पर्श झाल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. गावातील जनता विद्यालयात नववीत तो शिकत होता. गावच्या पोलीसपाटील देवयानी मोरे यांनी घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजेन्द्र होळकर यांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह नामपूर ग्रामीण रु ग्णालयात पाठवला. डॉ. मधुकर गावित यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे नामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप बिजोरसे ग्रामस्थांनी केला आहे.(वार्ताहर)

Web Title: The death of the school boy by Bijourse electric shock