शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:41 PM

चांदवड : चांदवडजवळ खैसवस्ती भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांवर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपाच जखमी : चांदवड तालुक्यात ग्रामस्थ व संशयितात झटापट

चांदवड : चांदवडजवळ खैसवस्ती भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांवर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिक वृत्त असे, चांदवडजवळ खैसवस्ती भागात डॉ. प्रकाश त्र्यंबक कबाडे यांच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार ते पाच दरोडेखोरांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.या हल्याच्या आवाजाने शेजारच्या वस्तीवरील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यूझाला. स्थानिकांनी मारहाण सुरू करताच अन्य चार दरोडेखोर पळून जाऊ लागले.  त्यावेळी त्यातील एकाला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रु ग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले. या हाणामारीत अन्य चार ते पाच जण जखमी झाले. संशयितासोबत झालेल्या झटापटीत खैसवस्ती परिसरातील चार ते पाच ग्रामस्थ जखमी झाले. त्यात नवनाथ कारभारी मोरे (३८), समाधान नवनाथ मोरे (१४), संतोष साहेबराव अहिरे (२६) , प्रकाश गंगाधर वाजदेव (३६)सर्व रा. खैसवस्ती यांचा समावेश आहे. २५ ते ३५ वयोगटातील संशयितांनी समाधान मोरे यास चाकुचा धाक दाखवत घराचा दरवाजा उघडायला सांगीत त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीवेळी संबधितांनी मदतीसाठी आरडाओरड केला. आवाज एैकून परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले असता संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात तीन जण जखमी झाले. दरम्यानच्या काळात घटनेचे वृत्त समजताच खैसवाडा अदिवासी वस्तीवरील ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी अज्ञात चोरट्यांचा पाठलाग केला. या दरम्यान ग्रामस्थ व संशयीतांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी झालेल्या जोरदार हाणामारीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या एका संशयीताचा मृत्यू झाला. यावेळी एका संशयीतास नागरीकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. घटनेत जखमी संशयिताच्या जवाबानंतर घटनेचा उलगडा होण्याचा विश्वास सुत्रांनी व्यक्त केला. या प्रकरणी नवनाथ कारभारी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड पोलीसांनी अनोळखी संशयीताच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या सहा महिन्यात याच घरावर दरोडा पडण्याची ही दुसरी वेळ असल्याची माहिती या घटनेतील जखमी असलेल्या नवनाथ मोरे यांची पत्नी नंदाबाई यांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.पोलिसांपुढे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानचांदवड परिसर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या विविध गुन्हे विषयक घटनांनी सर्वसामान्य नागरीकांनी चिंता व्यक्त केली आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चांदवड बसस्थानकावर दिवसाढवळ्या चालकाचा खून, मत्तेवाडी शिवारात पानी फाउण्डेशनचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव यांच्यात झालेली हाणामारी, चेन स्नॅचिंग, दुचाकी वाहने चोरीस जाण्याचा घटना सातत्याने घडत असताना पोलिसांपुढे गुन्हेगारी नष्ट करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.