स्टोव्हच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2014 01:41 IST2014-05-26T23:54:41+5:302014-05-27T01:41:17+5:30

नाशिक : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजलेल्या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील नवनाथनगर येथे राहणार्‍या रितादेवी संदीप प्रसाद (२१) ही महिला सोमवारी (दि़ १९) स्वयंपाक करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका होऊन ९० टक्के भाजली़ तिला उपचारासाठी पती संदीप याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

The death of the roasted woman in a stove | स्टोव्हच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू

स्टोव्हच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू

नाशिक : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजलेल्या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील नवनाथनगर येथे राहणार्‍या रितादेवी संदीप प्रसाद (२१) ही महिला सोमवारी (दि़ १९) स्वयंपाक करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका होऊन ९० टक्के भाजली़ तिला उपचारासाठी पती संदीप याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The death of the roasted woman in a stove