चक्कर येऊन पडल्याने प्रेस कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: October 11, 2015 21:41 IST2015-10-11T21:41:02+5:302015-10-11T21:41:33+5:30
चक्कर येऊन पडल्याने प्रेस कामगाराचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने प्रेस कामगाराचा मृत्यू
नाशिक : भारत प्रतिभूती मुद्रणालयमधील कामगार बाजीराव रामभाऊ हिरवे (४७, सद्गुरूनगर, जेलरोड) हे शनिवारी (दि़१०) सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते़ साडेअकरा वाजेच्या सुमारास काम करीत असताना हिरवे यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
घरफोडीत रोख रकमेची चोरी
घराच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात घडली आहे़ रामदास कॉलनीत राहणारे राकेश किशोर कदम हे १६ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटात ठेवलेले २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़