शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona : बेडसाठी आंदोलनाचा लढा यशस्वी करणाऱ्या 'त्या' रुग्णाची मृत्युशी झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 12:27 IST

सिडकोतील या रुग्णाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असूनही खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसिडकोतील या रुग्णाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असूनही खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक - कोरोना बाधित गंभीर रुग्णांना शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. मात्र, सिडकोतील अशाच एका रुग्णाला ऑक्सिजन कमी होऊनही वेळ मिळत नसल्याने त्याला थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावरच आणण्यात आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली अखेरीस महापालिकेने रुग्णवाहिका पाठवून त्यास नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आंदोलनाचा लढा यशस्वी करणाऱ्या रुग्णांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. 

सिडकोतील या रुग्णाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असूनही खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्याकडे हा प्रकार कथन केल्यानंतर त्यांनीही विविध रुग्णालयांमध्ये संपर्क साधला. मात्र, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने त्यांनी अखेरीस या रुग्णाला घेऊन थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनाची प्रवेशद्वार गाठलं.

शहरातील कोरोना बधितांचा आकडा वाढत असताना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत महापालिकेच्यावतीने खासगी आणि शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यास दुजोरा दिला. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मनपाची रुग्णवाहिका पाठवली आणि त्यानंतर या रुग्णास नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.  

आंदोलनासाठी महापालिकेत आणणारांवर गुन्हाकोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू