अॅम्ब्युलन्स अपघातात रुग्णाचा मृत्यू
By Admin | Updated: October 10, 2015 23:21 IST2015-10-10T23:20:33+5:302015-10-10T23:21:00+5:30
अॅम्ब्युलन्स अपघातात रुग्णाचा मृत्यू

अॅम्ब्युलन्स अपघातात रुग्णाचा मृत्यू
नाशिक : रुग्णास उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला शनिवारी (दि़१०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ठाणे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ यामध्ये चेतनानगर येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये राहणारे संजय शंकर सोनवणे (४८) या रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ शासकीय १०८ क्रमांकाच्या दूरध्वनीवरून ही रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. (प्रतिनिधी)