पैसे न मिळाल्याने मालेगावी एकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 13, 2016 01:39 IST2016-11-13T01:31:16+5:302016-11-13T01:39:30+5:30
पैसे न मिळाल्याने मालेगावी एकाचा मृत्यू

पैसे न मिळाल्याने मालेगावी एकाचा मृत्यू
मालेगाव : दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे न मिळाल्यामुळे शहरातील मिरादातारनगर भागात राहत असलेल्या इसमाचा शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी आठवडे बाजार व यंत्रमाग व्यवसायाला सुट्टी असल्यामुळे नोटांची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आली.
शुक्रवारी दिवसभर पैसे काढण्यासाठी येथील
बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर रांगेत उभे
राहूनही शेख अलाउद्दीन शेख शहाबुद्दीन (५२) रा. मिरादातारनगर या यंत्रमाग कामगाराला पैसे मिळाले नाहीत.
रात्री १०.३० च्या सुमारास त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. पैसे न मिळाल्याचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेची पोलिसांकडे मात्र कुठलीही नोंद नाही.