अंबडला विहिरीत पडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: December 21, 2015 00:11 IST2015-12-21T00:08:45+5:302015-12-21T00:11:28+5:30

अंबडला विहिरीत पडून एकाचा मृत्यू

The death of one after falling in Ambad well | अंबडला विहिरीत पडून एकाचा मृत्यू

अंबडला विहिरीत पडून एकाचा मृत्यू

नाशिक : अंबड गावातील फडोळ मळ्यात असलेल्या विहिरीत पडून एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि़२०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मयत इसमाचे नाव श्याम बळवंत फुलदेवरे (४५) असे असून तो उत्तमनगरच्या सर्वेश्वर चौकातील रहिवासी आहे़ नेहमीप्रमाणे कामाला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढला़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, एपीआय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू हाळदे व विसे अधिक तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: The death of one after falling in Ambad well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.