शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीदरम्यान मातोरीतील वृद्ध शेतकºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:58 IST

नाशिक : कोबीच्या रोपांवर औषध फवारणी  करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठवर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी  (दि़ ८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़ मातोरी, दरी रोड, ता़ जि़ नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  ...

नाशिक : कोबीच्या रोपांवर औषध फवारणी  करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठवर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी  (दि़ ८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़ मातोरी, दरी रोड, ता़ जि़ नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहराजवळील मातोरी-दरी रोडवर निवृत्ती पिंगळे यांची शेती आहे़या शेतीमध्ये त्यांनी कोबीची रोपे टाकलेली असून, दुपारी १ वाजेच्या सुमारास कोबीच्या रोपांवर कोडायझन नावाच्या औषधाची फवारणी करीत होते़ रोपावर औषधाची फवारणी करीत असताना त्यांना औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा पोलीसपाटील रमेश निवृत्ती पिंगळे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ़ गडे यांनी घोषित केले़  दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. च्औषध फवारणीच्या औषधाचा त्रास होऊ लागल्याने पिंगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात करण्यात आली आहे, तर हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ जी़ एम़ होले यांनी व्यक्त केली आहे़ पिंगळे यांच्या शरीरात कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू