अशोक कारभारी वाघ याच्या मालकीची शेत जमीन गट नंबर २२२ या मधील पन्नास फुट खोल विहिरीत सदर पाडस पडल्याचे भाऊराव वाघ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटना येवला वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय भंडारी यांना सांगितली असता त्यांनी ताबडतोब वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, मनोहर दाणे,मच्छिंद्र ठाकरे, बापू वाघ, रविंद्र निकम यांना घटनास्थळी पाठवुन सदर पाडसाला विहिरीतुन बाहेर काढले. पाडस हे साधारण तीन महिने वयाचे असून ते नर जातीचे आहे .रात्री विहिरीचा अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले असावे असा अंदाज वनपाल अशोक काळे यांनी व्यक्त केला. या परिसरात हजारांच्या आसपास हरिण असून मागील वर्षाच्या तुलनेत हरिणाच्या मृत्युचे प्रमाण कमी झाले आहेत. कधी पाण्याच्या शोधात, कधी रस्ता ओलांडताना तर कधी कुत्र्याच्या हल्ल्यात दरवर्षी पंधरा ते वीस हरणांना जीव गमवावा लागत असे परंतु गेल्या दोन ते तीन वर्षात हे प्रमाण कमी झाले आहे.
ममदापुर येथे विहिरीत पडून पाडसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:06 IST