विहिरीत पडून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2014 00:36 IST2014-06-09T00:35:02+5:302014-06-09T00:36:35+5:30
विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू
मालेगाव : झोडगे येथे मारुती मंदिरालगत विहिरीचे खोदकाम करताना कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने परप्रांतीय मजूर राजू काळू भिल्ल (वय२४, रा. बनियाला बंधा, ता. असिंधा, जि. भिलवाडा, राजस्थान) हा गंभीर जखमी झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले.
असता त्याचा मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्याचे जमादार साळुंके यांनी तालुका पोलीसात खबर दिली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास विहिरीचे खोदकाम करीत असताना राजू भिल्ल हा विहिरीत पडल्याने त्याच्या छातीला, डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.