शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

जवान कुलदीप जाधव यांचा मृत्यू : नवजात बाळाला बघण्याचे बापाचे स्वप्न नियतीने हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:15 IST

रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले.

ठळक मुद्देजम्मु-काश्मिरमध्ये बर्फवृष्टीचार वर्षांपुर्वी भारतीय सैन्यात भरती

नाशिक : जम्मु-काश्मिरमध्ये या हंगामात बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली असून रक्त गोठविणाऱ्या थंडीच्या कडाक्याने भारतीय सेनेतील वीर जवान व नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव(२५,रा.पिंगळवाडे) यांचा बळी घेतला आहे. कर्तव्यावर असताना राजौरी सेक्टरमध्ये त्यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आणि आपल्या आठवडाभराच्या बाळाला बघण्याचे जाधव यांचे स्वप्न नियतीने पुर्ण होऊ दिले नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीला जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाकडून रविवारी (दि.२२) दुजारो मिळाला.जम्मू-काश्मीर मध्ये भारताच्या सीमेवर तैनात असलेले जाधव यांचा कडाक्याच्या थंडीत झोपेतच मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने ते रविवारपासून सुट्टी घेऊन आपल्या पिंगळवाडे या मुळ गावी घरी परतणार होते; याबाबत त्यांचे काही दिवसांपुर्वीच कुटुंबियांशी फोनवरुन बोलणेही झाले होते; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असल्याने आपल्या लहानग्याला बघण्याचे जाधव यांची इच्छा पुर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या निधनाची वार्ता सोशलमिडियावर शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्हायरल होत होती; मात्र स्थानिक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिकृतपणे शनिवारी मध्यरात्रीपर्यंत कुठल्याहीप्रकारे दुजोरा दिला गेला नाही. यामुळे संभ्रामवस्था निर्माण झाली होती.

रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले. जाधव यांच्या पश्चात आठ दिवसांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.चार वर्षांपुर्वी भारतीय सैन्यात भरतीजाधव हे चार वर्षांपासून सैन्यात भरती झाले होते. जम्मू काश्मीरच्या लेह भागात ५०८ अ‍े.सी बटालियनमध्ये कर्तव्यावर तैनात होते. प्रवासादरम्यान ते कॅम्पमध्ये रात्री मुक्कामी थांबले असता सकाळी ते झोपेतून पुन्हा उठू शकले नाही यावेळी त्यांना तपासले असता ते मयत आढळून आले, अशी माहिती सैन्यदलाकडून सटाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गायकवाड यांना देण्यात आली. त्यांचे पार्थीव मंगळवारी सकाळपर्यंत सटाण्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDeathमृत्यूNashikनाशिकAccidentअपघात