बसच्या धडकेत जखमी गुंजाळ यांचा मृत्यू
By Admin | Updated: February 27, 2016 23:58 IST2016-02-27T23:56:56+5:302016-02-27T23:58:36+5:30
बसच्या धडकेत जखमी गुंजाळ यांचा मृत्यू

बसच्या धडकेत जखमी गुंजाळ यांचा मृत्यू
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या मिनी बसच्या धडकेने गंभीर जखमी झालेले एकलहरा रोड येथे राहणारे शिवनाथ रेवजी गुंजाळ यांचे निधन झाले.
के. एन. केला स्कूल गोरेवाडी रस्त्याने गुंजाळ हे दुचाकीवरून जात असताना मिनी बस (एमएच १५ के ३२५०) हिने गुंजाळ यांच्या व आणखी एका दुचाकीला धडक
दिल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले होते. अपघातात डोक्याला व छातीला मार लागल्याने गेल्या १५ दिवसांपासून शिवनाथ गुंजाळ हे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. शिवनाथ गुंजाळ
यांच्या अपघाती निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी बसचालक बाळकृष्ण विश्वनाथ घायवटे रा. मानसी अपार्टमेंट, चंद्रेश्वर नगर जेलरोड याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल गुंजाळ यांचे ते वडील होत. (प्रतिनिधी)