सातपूर गॅस दुर्घटनेत पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

By Admin | Updated: October 21, 2015 22:52 IST2015-10-21T22:52:15+5:302015-10-21T22:52:47+5:30

सातपूर गॅस दुर्घटनेत पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

Death of husband after wife in Satpur gas crash | सातपूर गॅस दुर्घटनेत पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

सातपूर गॅस दुर्घटनेत पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

नाशिक : सातपूर कॉलनीतील आंबेडकर मार्केटमधील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये गंभीररीत्या भाजलेल्या चव्हाण दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़
या दुर्घटनेत आरती चव्हाण या ७० टक्के, तर रवि चव्हाण ६० टक्के भाजले होते़ यातील आरती चव्हाण यांचे १२ आॅक्टोबरला, तर रवि चव्हाण यांचे मंगळवारी (दि़२०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़
सातपूर कॉलनीतील आंबेडकर मार्केटसमोरील महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या घर नंबर १७२४ मध्ये बुधवारी (दि़ ७) सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती़
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of husband after wife in Satpur gas crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.