विंचूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा उष्माघाताने मृत्यू
By Admin | Updated: April 2, 2017 02:21 IST2017-04-02T02:20:38+5:302017-04-02T02:21:23+5:30
विंचूर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच शिवसेना तालुका उपप्रमुख नीलेश शांताराम गायकवाड (३२) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

विंचूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा उष्माघाताने मृत्यू
विंचूर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच शिवसेना तालुका उपप्रमुख नीलेश शांताराम गायकवाड (३२) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा बसल्याने लासलगाव येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत ताप गेल्याने नीलेश यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. निधनाची बातमी समजताच विंचूर येथे बंद पाळण्यात आला. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यÞात आले. येथील शारदोत्सव व्याख्यानमालेत नीलेश गायकवाड यांचा सहभाग असायचा. गेल्या वर्षीच विवाहबंधनात अडकलेल्या नीलेश यांनी कमी वयातच ग्रामपंचायत निवडणूक लढवून यश संपादन केले होते.