औषध फवारणी करणाऱ्या भनवडच्या शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 8, 2015 01:27 IST2015-04-08T01:27:33+5:302015-04-08T01:27:59+5:30
औषध फवारणी करणाऱ्या भनवडच्या शेतकऱ्याचा मृत्यू

औषध फवारणी करणाऱ्या भनवडच्या शेतकऱ्याचा मृत्यू
नाशिक : शेतातील मीरची पिकावर औषध फवारणी करताना ते नाका-तोंडात गेल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील भनवड येथील रामा सोमा डंबाळे (६५) सोमवारी दुपारी शेतातील मिरचीवर औषधफवारणी करीत होते़ औषध नाका-तोंडात गेल्याने बेशुद्ध पडलेल्या डंबाळे यांना उपचारासाठी प्रथम वणी ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)