तळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 6, 2016 00:06 IST2016-04-05T23:58:12+5:302016-04-06T00:06:55+5:30
तळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

तळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू
निफाड : तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व सावरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सभापती अरुण मारुती कुशारे (३७) यांचा शेतातील शेततळ्यात तोल जाऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
कुशारे हे आपल्या शेतातील शेततळ्याकडे गेले होते. त्यांचा तोल गेल्याने ते तळ्यात पडले. बराच वेळ झाला घरी परतले नाही म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह तळ्यात तरंगताना दिसून आला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असावी असे सांगण्यात येत आहे. अरु ण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)