विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 13, 2017 01:17 IST2017-06-13T01:17:09+5:302017-06-13T01:17:52+5:30
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहोणेर : देवळा तालुक्यातील कणकापूर येथे विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
कणकापूर येथील शेतकरी साहेबराव दत्तू शिंदे (४०) हे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विद्युतपंप चालू करण्यासाठी विहिरीजवळील विद्युतपेटीजवळ गेले असता, विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
साहेबराव शिंदे यांच्या अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शिंदे यांच्या पार्थिवावर कणकापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा तालुक्यात विजेचा शॉक लागून सलग दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेला.