विहिरीत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 30, 2015 00:15 IST2015-03-30T00:15:26+5:302015-03-30T00:15:35+5:30

विहिरीत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

The death of the elderly woman by lying in the well | विहिरीत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

विहिरीत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

ओझर टाऊनशिप : वऱ्हे दारणा येथील एक वृद्ध महिला तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छबाबाई एकनाथ पवार (८०), रा. वऱ्हेदारणा ही वृद्ध महिला तिची शेळी दोरी सोडून पळाली म्हणून तिला पकडण्यासाठी जात असताना अंधारात वऱ्हेदारणा शिवारातील शिवाजी टर्ले यांच्या शेतातील विहिरीवर असलेल्या कठड्यावरून तोल गेल्याने ती पाण्यात पडली व बुडून तिचा मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त समजताच हवालदार श्यामराव सोनवणे व सुनील शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने छबाबाईचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.(वार्ताहर)

Web Title: The death of the elderly woman by lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.