रेल्वेचा धक्का लागून वृद्ध इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: August 19, 2016 00:45 IST2016-08-19T00:44:06+5:302016-08-19T00:45:43+5:30

रेल्वेचा धक्का लागून वृद्ध इसमाचा मृत्यू

The death of the elderly due to the jolt of the train | रेल्वेचा धक्का लागून वृद्ध इसमाचा मृत्यू

रेल्वेचा धक्का लागून वृद्ध इसमाचा मृत्यू

 नाशिकरोड : कोलकात्याहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचा मालधक्क्याजवळील लुपलाईनच्या जवळ धक्का लागल्याने सिन्नर फाटा येथील वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला आहे.
सिन्नर फाटा स्टेशनवाडी येथील अशोक लक्ष्मण भिलारे (६०) हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मालधक्का येथील रेल्वे लुपलाईन जवळून जात होते. यावेळी कोलकात्याहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयत भिलारे यांना कमी ऐकू येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे परिसरात अपघातात वाढ झाल्याने सुरक्षा वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: The death of the elderly due to the jolt of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.