बसने दिलेल्या धडकेत मृत्यू
By Admin | Updated: November 17, 2014 00:42 IST2014-11-17T00:41:49+5:302014-11-17T00:42:27+5:30
बसने दिलेल्या धडकेत मृत्यू

बसने दिलेल्या धडकेत मृत्यू
पंचवटी : डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाणाऱ्या इसमाचा बसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी कन्नमवार पुलाजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर डेपोची बस (एमएच १४, व्हीटी ३९८२) घेऊन चालक शरद सदानंद म्हात्रे हा रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई-आग्रा रोडने तपोवनाकडे जात होते़ यावेळी कन्नमवार पुलाजवळ गवताचा भारा घेऊन एक इसम (सुमारे ५५ ते ६० वय असलेला) अचानक बससमोर आल्याने अपघात झाला़ यामध्ये या इसमाचा जागीच मृत्यू झाला़ या इसमाचे नाव समजू शकले नसून बसचालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)