शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

पोलीस भरतीदरम्यान दिंडोरीच्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST

दिंडोरी : मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला.

दिंडोरी (जि. नाशिक) : मोलमजुरी करून पदवीचे शिक्षण घेऊन माता-पित्यांंचा आधार बनण्यासाठी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार (२४) या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील विशाल सुरेश केदार, गणेश सदाशिव दरगोडे, लक्ष्मण अंबादास गवळी हे तीन युवक मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे गेले होते. मंगळवारी त्यांच्या विविध चाचण्या झाल्या. त्यात हे तिघेही पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. बुधवारी सकाळी ७ वाजता हजर होते मात्र त्यांना दुपारी बारा वाजता त्यांची चाचणी सुरु झाली. शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात असतानाच विशालला चक्कर आली. गणेशने त्याला सावरत आधार देत झाडाचे सावलीला बसविले. त्याचवेळी मागून धावत येत असलेल्या त्याचा दुसरा मित्र लक्ष्मण याने विशालला अत्यवस्थ पडलेला पाहून त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विशालला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी विशालचे प्राणोत्क्रमण झाले.दरम्यान, इंदोरे ग्रामस्थ व विशालच्या नातेवाईकांनी दिंडोरी येथे प्रांत मुकेश भोगे व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. विशालचा मृत्यू पोलीस भरती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून केदार परिवारास शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेदिंडोरी तालुक्यातील इंदोरे या गावातील विशाल हा सुरेश केदार यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मोलमजुरी करीत विशालने आपले एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या चरितार्थासाठी विशालला नोकरीची नितांत आवश्यकता होती. म्हणून विशाल तात्पुरत्या मानधनावर इंदोरे ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून काम करीत असे. आपल्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने आपण नोकरीचा शोध घेतल्याशिवाय पर्याय नाही. याहेतूने विशाल दोन दिवसापूर्वी मुबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. त्याप्रसंगी त्याचा अंत झाला. घरातला कर्ता युवक अचानक गेल्याने केदार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.अधिवेशात औचित्याचा मुद्दाविशाल केदारच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबीयांस पाच लाख रु पयाची मदत करावी, अशी मागणी आमदार धनराज महाले यांच्याकडे करण्यात आली. अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाले यांनी केदार कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सखोल चौकशी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)