कोनांबेच्या इसमाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

By Admin | Updated: May 17, 2015 01:34 IST2015-05-17T01:34:21+5:302015-05-17T01:34:59+5:30

कोनांबेच्या इसमाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

Death of Cornamer's 'swine flu' | कोनांबेच्या इसमाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

कोनांबेच्या इसमाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

  नाशिक : सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील ४५ वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ मयत इसमाचे नाव राजाराम दामू डावरे असे आहे़ सोमवार (दि़११) रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी (दि़१३) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जानेवारी ते १६ मे २०१५ या कालावधीत सुमारे ३४ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, त्यात जिल्हा रुग्णालयातील २५ रुग्णांचा समावेश आहे़ सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील राजाराम डावरे यांना अत्यवस्थ स्थितीमध्ये सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही़ अखेर बुधवारी (दि़१३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दोन रुग्णांवर उपचार सुरू असून, दोघीही महिला आहेत़ यातील दोन्ही महिलांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असून, एकीचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयाचा, तर एकीचा खासगी दवाखान्यातील आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of Cornamer's 'swine flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.