तिसऱ्या मजल्यावरून पडून सेंटरिंग कारागिराचा मृत्यू
By Admin | Updated: March 21, 2015 23:31 IST2015-03-21T23:30:59+5:302015-03-21T23:31:15+5:30
तिसऱ्या मजल्यावरून पडून सेंटरिंग कारागिराचा मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरून पडून सेंटरिंग कारागिराचा मृत्यू
नाशिक : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेंटरिंगचे काम करीत असताना खाली पडून कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) दुपारी धु्रवनगरमधील एका इमारतीच्या साईटवर घडली़ या अपघातात मयत झालेल्या कारागिराचे नाव शालिग्राम बुरखुंडे (२८) असे आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
मूळचा परभणी सध्या इंदिरानगरमधील पद्मा अपार्टमेंटमध्ये राहणारा शालिग्राम ऊर्फ आम्रपाल दगडू बुरखुंडे (२८) हा सेंटरिंगचे काम करतो़ ध्रुवनगर परिसरातील साईचरण या इमारतीच्या बांधकाम साईटवर तो गेल्या काही दिवसांपासून सेंटरिंग कामासाठी जात होता़ शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरून कोसळला. (प्रतिनिधी)