युवक मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:10:23+5:30

युवक मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

In the death case of the driver filed a complaint with the driver | युवक मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

युवक मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

नाशिक : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आयशर वाहन (एमएच १५, डीके १२५१) चालविल्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेला फुलेनगर येथील सचिन ऊर्फ लखन दिलीप वाघ याच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालक रमेश भटू लोणारे (रा़धुळे)च्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मखमलाबाद शिवारात शनिवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास कोबीचा ट्रक भरून परतत असताना रस्त्यावरून गेलेली विद्युत तार आयशरच्या लोखंडी अँगलला अडकली़ यामुळे वाहनात विद्युत प्रवाह उतरला व यामध्ये वाघ याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी मयत युवकाचा भाऊ बबलू वाघ याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: In the death case of the driver filed a complaint with the driver