त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: June 29, 2015 00:50 IST2015-06-29T00:49:37+5:302015-06-29T00:50:02+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

Death of bruised woman in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

  नाशिक : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्याने भाजलेल्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत महिलेचे नाव ताईबाई विश्वनाथ दळवी (वय ५२) असे असून, ती त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील रहिवासी आहे़ शुक्र वारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका झाल्याने त्या ९५ टक्के भाजल्या होत्या़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of bruised woman in Trimbakeshwar taluka