मारहाण प्रकरणातील दुसऱ्या युवकाचाही मृत्यू

By Admin | Updated: January 23, 2016 23:35 IST2016-01-23T23:33:12+5:302016-01-23T23:35:34+5:30

मारहाण प्रकरणातील दुसऱ्या युवकाचाही मृत्यू

The death of another youth in the assassination case | मारहाण प्रकरणातील दुसऱ्या युवकाचाही मृत्यू

मारहाण प्रकरणातील दुसऱ्या युवकाचाही मृत्यू

नाशिकरोड : जेलरोड भीमनगर येथे सात दिवसांपूर्वी तिघा युवकांनी लोखंडी पाइपने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जेलरोड भीमनगर येथील दुसऱ्या युवकाचेदेखील उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ कारणावरून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित प्रवीण ऊर्फ विठ्ठल प्रकाश आव्हाड (२६) रा. भोर मळा, गोरेवाडी, आशिष मच्छिंद्र पगारे (२३) रा. शास्त्रीनगर गोरेवाडी, आतिश ऊर्फ काळू श्याम पवार (२४) रा. गुलाबवाडी मालधक्कारोड यांनी लोखंडी पाइपने नंदादीप जाधव व सुमेध सुनील गुंजाळ, स्वप्नील श्यामराव दोंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.

Web Title: The death of another youth in the assassination case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.