त्र्यंबकला बिजनाथ महाराजांची पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:26 IST2017-09-17T00:26:11+5:302017-09-17T00:26:39+5:30

जवळील पेगलवाडी येथील रिद्धिनाथ धाम येथे ब्रह्मलीन योगी रिद्धिनाथ गुरु योगी बिजनाथ महाराज यांची नववी पुण्यतिथी, तर ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धिनाथ यांच्या तिसरा पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो साधुसंत व भाविक उपस्थितीत होते.

Death anniversary of Trimbak Bijanath Maharaj | त्र्यंबकला बिजनाथ महाराजांची पुण्यतिथी

त्र्यंबकला बिजनाथ महाराजांची पुण्यतिथी

त्र्यंबकेश्वर : जवळील पेगलवाडी येथील रिद्धिनाथ धाम येथे ब्रह्मलीन योगी रिद्धिनाथ गुरु योगी बिजनाथ महाराज यांची नववी पुण्यतिथी, तर ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धिनाथ यांच्या तिसरा पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो साधुसंत व भाविक उपस्थितीत होते.
यावेळी पंडित विनयकुमार तिवारी, पंडित उत्तमशास्त्री शर्मा यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सर्व आखाड्यांचे महंत, साधुसंत तसेच राज्यातून व परराज्यातून आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब पाठक, शिवाजी चुंभळे, मांगीलाल सारडा, संजय काठे, प्रशांत हांडोरे, कुमार भाऊ, परेश शर्मा, तानाजी तिदमे, पांडुरंग कोठुळे, गणेश कोठुळे, पांडुरंग आचारी, छगन आचारी, गणपत कालेकर, विनोद चुंभळे, गिरीश जाधव, मधुकर रणमाळे, गोरख नवले, राज चारस्कर, चंदू
आव्हाड, बाबू नवले, जयप्रकाश मोरे, राजन सिंह, हरिमत सिंह, रामकृष्ण शर्मा, निवृत्ती शिंदे, लक्ष्मण आचारी, अशोक दिवे, गणेश मोरे, नीलेश कचोळे, दयाशंकर त्रिपाठी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Death anniversary of Trimbak Bijanath Maharaj