मृत्युंजयदूतांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:23+5:302021-07-22T04:10:23+5:30

सिन्नर : वाढती वाहनांची संख्या व वाहतुकीचे नियम न पाळल्याने, तसेच वेगावर नियंत्रण न ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे प्रतिपादन ...

Death angels need first aid training | मृत्युंजयदूतांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण गरजेचे

मृत्युंजयदूतांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण गरजेचे

सिन्नर : वाढती वाहनांची संख्या व वाहतुकीचे नियम न पाळल्याने, तसेच वेगावर नियंत्रण न ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे प्रतिपादन सिन्नर ग्रामिण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. सिन्नर वाहतूक पोलीस मदत केंद्र, तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैद्यकीय प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा लहाडे बोलत होत्या. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सहायक पोलीस निरीक्षक, तसेच महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी विजय आढाव, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तडवी, नितीन उके, सिन्नर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, डॉ. श्यामसुंदर झळके, डॉ. राजेंद्र मुदबखे, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता वाळुंज आदी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. वर्षा लहाडे यांनी यावेळी रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांना मदत करताना, त्यांच्यावर वैद्यकीय प्राथमिक उपचार कसे करावेत, काळजी कशी घ्यावी, याची शास्त्रीय माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले. ------------------

फोटो ओळी- प्रादेशिक परिवहन विभाग व महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र सिन्नरच्या वतीने प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिबिरात प्रात्यक्षिक करताना डॉ. वर्षा लहाडे व इतर मान्यवर. (२० सिन्नर २)

200721\525320nsk_10_20072021_13.jpg

२० सिन्नर २

Web Title: Death angels need first aid training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.