ओझर उड्डाणपुलावरील अपघातातील जखमीचा मृत्यू

By Admin | Updated: March 10, 2017 01:29 IST2017-03-10T01:29:00+5:302017-03-10T01:29:11+5:30

ओझर टाउनशिप : येथील उड्डाणपुलावर पुढे जाणारा टेम्पो रस्त्यात थांबल्याने पाठीमागून येणारी मोटारसायकल त्यावर आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू झाला.

Death of an accident on the flyover flyover | ओझर उड्डाणपुलावरील अपघातातील जखमीचा मृत्यू

ओझर उड्डाणपुलावरील अपघातातील जखमीचा मृत्यू

 ओझर टाउनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या एचएएल मेनगेटसमोरील उड्डाणपुलावर पुढे जाणारा टेम्पो अचानक रस्त्यात थांबल्याने पाठीमागून येणारी मोटारसायकल त्यावर आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्याचा मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तुकाराम परशराम पवार व विक्रम शांताराम आहिरे (रा. कानमंडाळे, ता. चांदवड) हे मोटारसायकलने (एमएच १५ सीके ५७६९) पिंपळगावकडून ओझरकडे येत असताना एचएएल मेनगेटसमोर उड्डाणपुलावर पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पो (एमएच १५ एजी ३७२७) अचानक रस्त्याच्या मध्यभागी थांबल्याने मोटारसायकल त्यावर आदळून झालेल्या अपघातात मोटारसायकल-स्वार पवार व आहिरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारच्या सुमारास तुकाराम पवार यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)

Web Title: Death of an accident on the flyover flyover