संप मिटला, लढा सुरूच

By Admin | Updated: June 9, 2017 17:55 IST2017-06-09T17:55:03+5:302017-06-09T17:55:03+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : शेतमालाचे लिलाव सुरू

The deal erupted, the fight continued | संप मिटला, लढा सुरूच

संप मिटला, लढा सुरूच


लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : संपूर्ण कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आठव्या दिवशी मिटल्याने शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार पालेभाज्यांनी भरगच्च झाला होता. संप मिटला असला तरी मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत बाजार समितीत जवळपास २३२८ क्ंिवटल इतक्या शेतमालाची आवक आली होती.
बाजार समितीत फ्लॉवर, टमाटे, काकडी, भोपळा, गिलके, दोडके, वांगी, ढोबळी मिरची असा शेतमाल सकाळी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला होता. दुपारपर्यंत जवळपास साडेतीन हजार क्ंिवटल शेतमालाची आवक आली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिली. बाजार समितीत दुपारी फळभाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शेतकरी संपावर जाण्यापूर्वी जो बाजारभाव होता तसाच बाजारभाव शुक्रवारी झालेल्या लिलावात शेतकऱ्यांना मिळाला. ढोबळी मिरची २२० रुपये (१० किलो), कारले ३५० रुपये (१२ किलो), वांगे ४०० रुपये (१५ किलो), भोपळा २५० रुपये (१८ नग) असा बाजारभाव फळभाज्यांना मिळाला.

Web Title: The deal erupted, the fight continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.