नाशिक : राज्यात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आणि आॅगस्टच्या प्रारंभीच अतिवृष्टीमुळे कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने दळणवळण व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केले असून, दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उद्भलेल्या पूरस्थितीमुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे महासिईटीनेही अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.पदविका प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक डीटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महासीईटीच्या पोर्टलवर सुधारित वेळापत्रक पाहायला मिळणार आहे. सध्या दहावी, बारावीनंतरच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीपदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, या अभ्यासक्रमांची तिसºया फेरीनुसार प्रवेश होत आहे.अभियांत्रिकी पदवी प्रवेशाच्या तिसºया कॅप राउंडमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश संपर्क केंद्रावर (एआरसी) जाऊन आपले अर्ज निश्चित करावे लागणार आहे.१३ आॅगस्टपर्यंत दिली मुदततिसºया फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या मुदतीत प्रवेश घेता आले नाही. त्यामुळे तिसºया फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी आता १३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़
डिप्लोमा प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:58 IST
राज्यात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आणि आॅगस्टच्या प्रारंभीच अतिवृष्टीमुळे कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने दळणवळण व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केले असून, दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
डिप्लोमा प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ
ठळक मुद्देवेळापत्रकात बदल : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या राउंडची आज मुदत