परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑगस्टपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:22+5:302021-07-22T04:11:22+5:30

या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी राज्यातून दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार ...

Deadline to apply for foreign scholarship is 1st August | परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑगस्टपर्यंत

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑगस्टपर्यंत

या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी राज्यातून दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर २००च्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थी व पालक दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे अशा या परदेश शिष्यवृत्तीसाठी प्रमुख अटी आहेत.

विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावरील अर्ज नवीन संदेश या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा, विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज, कागदपत्रे, करारनामे व हमीपत्र यासह १ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Deadline to apply for foreign scholarship is 1st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.