शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:52 IST

मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले.

ठळक मुद्देठोस कारणाच्या निदानाकरिता 'व्हिसेरा' प्रयोगशाळेत

नाशिक : आडगाव येथील एका द्राक्षबागेत सात वर्षे वयाचा प्रौढ नर बिबट्या मृतावस्थेत सोमवारी (दि.१४) आढळून आला. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविला असला तरी ठोस कारणाच्या निदानाकरीता शवविच्छेदनानंतर 'व्हिसेरा' मेरीच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव शिवारातील प्रभाकर माळोदे यांच्या गट क्रमांक ११९९ येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना द्राक्षबागेत एक मोठा बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तत्काळ मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह अशोकस्तंभावरील दवाखान्यात हलविला. पशुधनविकास अधिकारी डॉ.वैशाली थोरात यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे ठोस कारण अहवालात नमुद करण्याकरिता थोरात यांनी ह्यव्हिसेराह्ण राखून ठेवत प्रयोगशाळेकडे रवाना केला आहे. हा बिबट्या साधारणत: दोन दिवसांपुर्वी झाला असावा असा अंदाज असल्याचे थोरात यांनी सांगितले.दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी असल्यामुळे बिबट्याच्या मृत्यूचे ठोस कारण नमुद करणे गरजेचे असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, प्रथमदर्शनी अंतर्गत रक्तस्त्राव, संसर्ग हे कारण नोंदविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवforestजंगलforest departmentवनविभागAccidentअपघात