चांदोरीच्या दोन तरुणांचा नदीपात्रात मृतदेह

By Admin | Updated: September 17, 2016 00:10 IST2016-09-17T00:10:21+5:302016-09-17T00:10:29+5:30

चांदोरीच्या दोन तरुणांचा नदीपात्रात मृतदेह

Dead bodies of two young men of Chandori | चांदोरीच्या दोन तरुणांचा नदीपात्रात मृतदेह

चांदोरीच्या दोन तरुणांचा नदीपात्रात मृतदेह


निफाड : तालुक्यातील चांदोरी येथील दोन तुरुणांचे मृतदेह सायखेडा येथील गोदावरी नदीपात्रात तरंगताना मिळून आले. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्र वारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सायखेडा येथील गोदावरी पात्रात दोन अज्ञात इसमांचे मृतदेह तरंगताना काही नागरिकांनी दिसून आले. त्यांनी तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीपत्राबाहेर काढले.
याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर सदर मृतदेह चांदोरी येथील अमोल अण्णासाहेब मोरे (२४) व सागर सुदाम वाळुंज (२५) यांचे असल्याचे समोर आले. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन निफाड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिरे, निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सायखेडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या घटनेनेबाबत सर्व बाजूने तपास करीत आहेत. मृत मोरे आणि वाळुंज हे दोघेही तरु ण शेतकरी होते. सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Dead bodies of two young men of Chandori