त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:52+5:302021-07-27T04:15:52+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असताना शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत ...

Daytime water supply in Trimbakeshwar city | त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असताना शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरला असताना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी काॅलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासी यांना गेल्या सात दिवसांपासून पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातून पाणी भरून नेण्याची वेळ आली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती असताना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नाही. याचेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविक अशा परिस्थितीत युध्द पातळीवर मोटार दुरुस्त करणे गरजेचे असतांना कासवगतीने व बेफिकिरीने मोटार दुरुस्तीला टाकण्यात आली ती आता दुरुस्त होऊन झाली की नाही याबाबत कोणताच पाठपुरावा केलेला नाही.

अखेर सोमवारी (दि.२६) सायंकाळी मोटार दुरुस्त करुन आणल्याचे समजले. तोपर्यंत ज्या रहिवासीयांना सात-आठ दिवस पाणीच न आल्याने ते लोक विहिरी, झरे यांचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळाले. पावसाळी वातावरण त्यात अशुद्ध पाणी पिल्याने काहींना सर्दी, खोकला, जुलाब असा त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या डॉक्टरांकडे फेऱ्या वाढल्या आहेत. वास्तविक नगरपरिषदेत अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून नगरपरिषद पाणी उचलत असताना त्र्यंबक पालिकेला आपल्या पदरी एखादी दोन मोटार जादा ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात अशा हलगर्जीपणाबद्दल नागरिकांनी नाराजी बोलून दाखविली.

Web Title: Daytime water supply in Trimbakeshwar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.