भर दिवसा पंचेचाळीस हजार लांबविले

By Admin | Updated: September 2, 2016 22:33 IST2016-09-02T22:32:50+5:302016-09-02T22:33:03+5:30

भर दिवसा पंचेचाळीस हजार लांबविले

The day was about forty-five thousand long | भर दिवसा पंचेचाळीस हजार लांबविले

भर दिवसा पंचेचाळीस हजार लांबविले


कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील एका
दुकानदाराला चोरट्यांनी भर
दिवसा सुमारे पंचेचाळीस हजार रुपयांना गंडा घातला आहे. दरम्यान, चोरीची तक्रार नोंदविण्यास
सायखेडा पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याची तक्रार दुकानदार मंगेश भन्साळी यांनी केली.
चांदोरी येथे गणाधिश पार्कमध्ये इंडियन बॅँकेजवळ मंगेश भन्साळी यांचे पशुखाद्य, बी-बियाणेचे दुकान आहे. दुपारच्या सुमारास दोन अनोळखी इसम सुतळी घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले.
सुतळी मोजून देत असतानाच लक्ष विचलित करून दुकानातील पंचेचाळीस हजार सहाशे रुपये व कागदपत्रे लांबविले.
याबाबत सायखेडा पोलिसांत चोरीची तक्रार देण्यासाठी गेलो
असता पोलिसांनी टाळाटाळ
केली असल्याची तक्रार भन्साळी
यांनी केली आहे. तब्बल दोन दिवसांनंतर पोलिस चौकशीसाठी आले असल्याचे भन्साळी यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The day was about forty-five thousand long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.