शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:33 IST

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले.

नाशिक : १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले.  शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली.  धुळे जिल्ह्णातील विखरण येथील धर्मा पाटील यांनीदेखील अलीकडेच आत्महत्या केली असून, शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असताना सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यां विषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, बंद उपसा जलसिंचन संस्थांचे कर्ज माफ करावे, पॉलिहाउस, शेडनेट, शेतीपूरक सर्व कर्ज माफ करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.  अन्नत्याग आंदोलनाच्या समारोपात जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्णातील शेतकºयांनी १९९५ ते २००० या काळात सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन केल्या. त्यासाठी जिल्हा बॅँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला, परंतु या योजनेत शेतकºयांना थेंबभर पाणीही शेतीला मिळाले नाही. उलट शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेने बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांना अन्य बॅँकांकडून कर्ज घेणेही मुश्कील झाले आहे. जळगाव जिल्ह्णातील बंद उपसा जलसिंचन संस्था पुन्हा उभारण्यासाठी राज्य सरकारने २५ कोटींचे अनुदान दिले त्याच धर्तीवर जिल्ह्णातील संस्थांचे कर्ज मुक्त करावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, वृद्धापकाळात शेतकºयांना पेन्शन द्या, चांदवड, निफाड येथील द्राक्ष उत्पादकांना बुडविणाºया व्यापाºयांचा शोध घ्यावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राजू देसले, करण गायकर, गणेश कदम, भास्कर शिंदे, धर्मराज शिंदे, नंदकुमार कर्डक, संपत थेटे, नामदेव बाराडे, सुभाष शेळके, एकनाथ दौंड, भीमा उगले, भास्कर उगले, संजय बैरागी,  पंकज विधाते, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या