शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे करांची पहाट होतेय हरीनामाच्या भक्तिमय मधुर स्वरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 16:16 IST

पाथरे : पाथरे येथील मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपहाटेच्या शांत वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती चा मधुर सूर निनादत आहे.

पाथरे : पाथरे येथील मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.पाथरे येथील श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पहाटे काकड आरती परंपरा जोपासली जात आहे. कोरोना काळातही काकड आरती परंपरा जपली जात आहे.सॅनिटायझर, सामाजिक दुरी याचे यावेळी पालन केले जात आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यामुळे हा कालावधी वाढला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात पहाटे काकड आरती केली जाते. काकडा आरती म्हणजे एक महिन्या चालणारा हा उत्सव असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार महत्व आहे. पहाटेच्या शांत वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती चा मधुर सूर निनादत आहे. काकड आरती मध्ये ज्येष्ठ, तरुण, महिला, बालके यांचा समावेश दिसतो आहे. यामुळे संस्कारक्षम पिढी घडते आहे. काकडा आरतीत भूपाळी, भजने, भक्ती गीते, अभंग, गवळण यांनी ग्रामस्थांच्या दिनक्रमास सुरुवात होत आहे. टाळ,मृदुंग, शंख, तानपुरा, घंटानाद आणि झांजेच्या मधूर स्वराने पाथरे करांची पहाट उल्हासित होत आहे. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा काकडा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. या काळात पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरांमधून काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे. पहाटे काकडा पेटवून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. जय जय राम कृष्ण हरी, उठा उठा प्रभात झाली, उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा साधु संत साधा आपले हित, उठा सकळजन उठले नारायण, आम्ही गरीब गवळ्याच्या नारी, मुका झालो वाचा गेली, बहिरा झालो या जगी बहिरा झालो या सारखे अनेक भक्ती गीतांनी, भजनांनी पहाट साजरी होत आहे. सकाळी आरती व संध्याकाळी हरिपाठ, भजन, गवळण यामुळे तरुण, लहान बालके सुसंस्कारी होण्यास चालना मिळत आहे. काकड आरतीला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा, संत मुक्ताई या संतांचे अभंग, भजनं म्हटले जातात. एका तालासुरात मंजुळ स्वरात आरती, पुष्पांजलि, प्रसाद गीत व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्वांना फराळ, चहा पाणी देऊन समारोप होत असतो. काकडा समाप्ती नंतर आळंदी येथे जाण्यासाठी पायी दिंडीचे सुद्धा आयोजन करण्यात येते परंतु याकोरोना काळात पायी दिंडी सोहळा होईल की नाही याची चिंता ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर दिसत आहे. काकड आरती सोहळ्यात दत्त भजनी, मंडळ श्रीराम भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, शनेश्वर भजनी मंडळ, गहिनीनाथ महिला भजनी मंडळ आदी मंडळांनी सहभाग घेत आहे.

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासTempleमंदिर