भूपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट
By Admin | Updated: October 24, 2014 01:03 IST2014-10-24T00:49:05+5:302014-10-24T01:03:51+5:30
भूपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट

भूपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट
सिन्नर : कोजागरी पोर्णिमेपासून त्रिपुरारी पोर्णिमा या कालावधीत येथील आठ मंदिरांमध्ये भजनी मंडळांच्या वतीने काकडारती करण्यात येत आहे. यंदाही हा उपक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पहाट आता मंगलमय सुरांनी उजाडते आहे.
पहाटेच्या मंगल सुरांनी नटलेल्या भूपाळ््यांनी काकड आरतीच्या भजनांनी सिन्नरकर मंत्रमुग्ध होत आहेत. शहरातील आठ मंदिरात सुरू असलेल्या भूपाळ््यांनी अष्ट दिशा सप्तसुरांच्या मंगलमय वातावरणात उजळून निघत आहेत. येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात त्र्यंबकबाबा भगत यांच्या नेतृत्वाखाली चिंतामन भगत, विलास भगत, श्रीरंग कावडकर, बाळू रेवगडे, राजू रेवगडे, आदिं भजनी मंडळाचे गायक, वादक पहाटे पाचपासून मंदिरात दाखल होत असून, भजने सादर करीत आहेत.