गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणूनच संघर्ष

By Admin | Updated: August 24, 2015 23:26 IST2015-08-24T23:26:00+5:302015-08-24T23:26:29+5:30

पंकजा मुंडे : व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची सहविचार सभा

As the daughter of Gopinath Munde's struggle | गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणूनच संघर्ष

गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणूनच संघर्ष

नाशिक : मी राजघराण्यात जन्माला आलेली नाही, पण एका राजाच्या पोटी जन्म घेतला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. संघर्षातून त्यांनी एक वेगळी उंची गाठली. मलाही आता सत्ता आली तरी संघर्ष करावा लागत आहे. पण संघर्ष नसला, तर मी मुंडेच्या पोटची मुलगी कसली, असे प्रतिपादन ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यावेळी झालेल्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे, व्हि. एन. नाईकचे माजी अध्यक्ष एन. एम. आव्हाड, किशोर दराडे, पंढरीनाथ थोरे, लक्ष्मण जायभावे, बी. पी. आव्हाड, प्रभाकर धात्रक, बबनराव सानप, मनीषा बोडके, प्रकाश घुगे, विक्रांत चांदवडकर, दामोदर मानकर, मनीषा हेकरे, गोविंद केंद्रे, संपत वाघ, विठ्ठल चांदे, उदय सांगळे आदि उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना हेमंत धात्रक यांनी संस्थेच्या अनुदानाबाबतच्या अडचणींचा पाढा वाचला. तसेच भगवान गड येथे गोपीनाथ गड उभारण्यासाठी व्ही. एन. नाईक संस्थेच्या मार्फत नाशिकमधून निधी उभारण्याबाबतची माहिती दिली. अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी भाषणात सांगितले की, गोपीनाथ मुंडे हे केवळ वंजारी समाजाचे नेते नव्हे तर ते बहुजन समाजाचे नेते होते. त्यांना एका विशिष्ट समाजात अडकविणे चुकीचे ठरेल. यावेळी त्यांनी संस्थेच्या अडचणी सांगितल्या.
पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंडे साहेबांची जागा घेण्याइतपत मी मोेठी नाही. त्यांची जागा मी कधीही घेऊ शकणार नाही. मात्र त्यांनी ज्या रस्त्यावर चालण्यासाठी मला उभे केले, त्या रस्त्यावर चालण्यासाठी मी जीवन वाहून घेतले आहे. मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. संघर्षातून ते मोठे झाले. आपण कोणत्याही राजघराण्यात जन्माला आलेले नाही. मात्र एका राजाच्या पोटी जन्म घेतला आहे. आताही माझ्यावर अनेक संकटे आली. मी थोडेसे घाबरले होते. मात्र जीवनात संघर्ष नसला तर मी मुंडेंची मुलगी कसली, असे पंकजा यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंडे साहेबांचा जाती-पाती, वंशवाद, घराणेवाद, पक्षवाद यांच्यावर विश्वास नव्हता. मात्र मला माझ्या समाजाचा अभिमान बाळगण्यात गैर वाटत नाही. मी या संस्थेचे पालकतत्व स्वीकारले असून, माझ्या लोकांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: As the daughter of Gopinath Munde's struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.