शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तयात्रोत्सवाची तयारी पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 20:02 IST

कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रती गाणगापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन सप्तरंगात न्हाऊन निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी श्रीक्षत्र मौजे सुकेणे नगरी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देश्री क्षेत्र मौजे सुकेणे : सप्तरंगात रंगणार पालखी सोहळा

कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रती गाणगापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन सप्तरंगात न्हाऊन निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी श्रीक्षत्र मौजे सुकेणे नगरी सज्ज झाली आहे.मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोउत्सव रंगपंचमी सोमवारी (दि.२५) पासून सुरु होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन, दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सुमारे साडे सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या पेशवेकालीन ह्या यात्रेतील सप्तरंगात न्हाऊन निघणारा दत्त पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात.पाच दिवस चालणाऱ्या सदर यात्रेत संपूर्ण महानुभाव पंथीय भाविक सहभागी होतात. याठिकाणी विडा अवसर, नारळ हि पूजा देवाला भाविक आवर्जून वाहतात व नवसपूर्ती करतात. यात्रेत रेवडी, साखरेचे हार, कडे, गुडीशेव, जिलबी याची मोठ्या प्रमाणात विक्र ी होते.जिल्ह्यातील मोठा यात्रौत्सव म्हणून ओळख असलेल्या या यात्रेची तयारी सर्व पातळीवर पूर्ण झाली आहे. रविवारी (दि.२४) राज्याच्या विविध भागातून भाविक व यात्रेकरू श्रीक्षेत्र मौजे सुकेणेत डेरेदाखल झाले आहेत. मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरू भाविकांना जागा, पाणी, व्यवस्था तसेच बाणगंगा नदी पात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे नदीपात्रातही रहाट पाळणे, व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात अशी माहिती सरपंच वृषाली भंडारे व ग्रामविकास अधिकारी एस. जी. सनेर यांनी दिली. दत्त मंदिर संस्थानाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.यात्रेसाठी बाणगंगा नदीपात्रात यंदाही मोठमोठी आकाश पाळणे दाखल झाले आहेत. चार दिवसांच्या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते. सुकेणेत चैतन्य पर्व निर्माण झाले आहे.महाराष्ट्रात महानुभाव पंथीयांच्या जाळीचा देव, माहूर, फलटण या स्थानानंतर श्री क्षेत्र मौजे सुकेणे मंदिराचा समावेश होतो. गंगातीर भ्रमण करतांना चक्र धर स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम मौजे सुकेणे येथे होता. सुकेणेकर संत परंपरा याठिकाणी असून या यात्रेला पेशवे कालीन परंपरा आहे. दत्त प्रभू पालखीपुढे उधळणारा रंग हा प्रसाद म्हणून भाविक अंगावर घेतात. अशी येथे श्रद्धा आहे.रोडरोमियो तसेच टवाळखोरांची हयगय केली जाणार नाही. यात्रोत्सव काळात नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे.- भगवान मथुरे,पोलिस निरीक्षक, सुकेणे पोलिस दुरक्षेत्र.