दत्तू भोकनळचे उत्स्फूर्त स्वागत

By Admin | Updated: August 21, 2016 23:07 IST2016-08-21T22:52:58+5:302016-08-21T23:07:32+5:30

तळेगाव रोही : विविध संस्थांकडून आर्थिक मदत

Dattu Bhokanal's spontaneous reception | दत्तू भोकनळचे उत्स्फूर्त स्वागत

दत्तू भोकनळचे उत्स्फूर्त स्वागत

 तळेगाव रोही : येथील नावलौकिक मिळविलेला दत्तू भोकनळ या खेळाडूने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून अनेक संस्थांनी त्याला अर्थिक मदत दिली़
मुंबई येथील सन १९६० दरम्यान पीपल्स वेल्फेअर सोसायटीच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक छोट्याशा गटातील, नाट्यसृष्टीशी संबधित असलेल्या, शिक्षक पद्ममाताई, कलाताई, सुब्बालक्ष्मी (सी.ए.), रमेश लक्ष्मण, सुदर्शन निर्देशक युरा हेल्थ, केअरचे व्यंकटेश, महाराष्ट्र अभंगरत्न आर. यू. रुतमार्ग कमर्शियल प्रा. लि.चे गणेशकुमार, युनियन बॅँक मुबईचे माजी महाप्रबंधक महेश्वरन आदिंनी भोकनळ याच्या तळेगाव रोही येथील घरी जाऊन तीस हजारांची मदत दिली. यावेळी दत्तू भोकनळचे बंधू युवराज भोकनळ, गोकुळ भोकनळ यांच्याकडे मदतीचा धनादेश दिला.
यावेळी विनायक व्ही. टेंभुने, दिलीप वाणी, अमोल कुलकर्णी, मंगेश पाटील, सरपंच शिवराम पाटील, बाळासाहेब भोकनळ, ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. दहिफळे, रवींद्र शेळेक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Dattu Bhokanal's spontaneous reception