दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

By Admin | Updated: October 1, 2016 17:05 IST2016-09-30T23:02:25+5:302016-10-01T17:05:03+5:30

दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

Dattu Bhokanal honored Nifadala | दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

निफाड : रियो आॅलिम्पिकमध्ये रोइंग स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू
भोकनळ यांचा निफाड येथील वैनतेय विद्यालयात सत्कार करण्यात आला.
न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे यांच्या हस्ते भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक बी. आर. सोनवणे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना भोकनळ म्हणाले की, आर्मीत गेल्यानंतर मला आर्मीमुळे रोइंग खेळाबद्दल प्रचंड प्रेरणा मिळाली. माझ्यातील गुण ओळखून मला प्रोत्साहन देण्याचे काम आर्मीने केले. त्यानंतर केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे आणि माझ्या आयुष्यातील गुरू माझे आई, वडील यांच्या आशीर्वादामुळे मी रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकलो. २०२० साली होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवणे हे माझे ध्येय आहे. तरुणांना आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रचंड मेहनत घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. याप्रसंगी वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भोकनळ यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना भोकनळ यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी निफाड सहायक निबंधक कार्यालयातर्फेकृष्णा वाळके व सुनील गांगुर्डे यांनी भोकनळ यांचा सत्कार केला. याप्रसंगी वि. दा. व्यवहारे यांचे भाषण झाले.
यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षक मालती वाघवकर, डी. बी. वाघ, बि. वाय. सोनवणे, रवींद्र कर्वे, एस. एम. सोनवणे, सागर निकाळे, श्रीहरी पाटील, विक्र म वाघचौरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Dattu Bhokanal honored Nifadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.