सरदवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय शिरसाट बिनविरोध
By Admin | Updated: September 8, 2016 00:25 IST2016-09-08T00:25:18+5:302016-09-08T00:25:28+5:30
सरदवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय शिरसाट बिनविरोध

सरदवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय शिरसाट बिनविरोध
सरदवाडी : सिन्नर शहराजवळील सरदवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय मारुती शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वंदना राम शिरसाट यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले उपसरपंचपदासाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. ग्रामसेवक तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सरपंच कविता अरुण बोकड, वंदना राम शिरसाट, सिंधू संजय शिरसाट, कोकिळा विलास शिरसाट, दत्तात्रय बाबूराव शिरसाट, प्रमोद सीताराम शेळके, दत्तात्रय मारुती शिरसाट आदि उपस्थित होते.
उपसरपंचपदासाठी दत्तात्रय शिरसाट यांनी सादर केलेल्या अर्जावर सुचक म्हणून सिंधू शिरसाट यांची स्वाक्षरी होती.
शिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक काळे यांनी केली. यावेळी शिरसाट समर्थकांनी गुलालाची उधळण करून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी पोलीसपाटील पंढरीनाथ शिरसाट, अरुण बोकड, राम शिरसाट, माजी उपसरपंच संजय शिरसाट, संतोष शिरसाट, नंदकुमार शिरसाट, प्रमोद शिरसाट, माजी उपसरपंच योगेश रेवगडे, ललित शिरसाट, भूषण दळवी, अमोल शिरसाट, योगेश शिरसाट, स्वप्निल पाटील, विनायक बोडके, बाजीराव पवार, सचिन पाटील, गणेश बोऱ्हाडे, अक्षय शिरसाट, प्रवीण शिरसाट, प्रकाश कोरडे, प्रवीण महात्मे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिपिक बाबूराव शिरसाट यांनी निवडणूक कामात साहाय्य केले. (वार्ताहर)