कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी दत्त नामस्मरण सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST2021-04-28T04:15:41+5:302021-04-28T04:15:41+5:30
राज्यभरातील महानुभाव पंथियांचे पवित्र स्थान असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून बंद ...

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी दत्त नामस्मरण सप्ताह
राज्यभरातील महानुभाव पंथियांचे पवित्र स्थान असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून बंद आहे, मंदिरात निवासी असलेल्या सुकेणेकर संताच्या उपस्थितीत दैनंदिन त्रिकाल पूजा केली जाते. देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे याकरिता मंदिरात कोरोनाविषयक नियमांचे पालन करत फक्त पाच प्रमुख संतांच्या उपस्थितीत दत्त नामस्मरण सप्ताह प्रारंभ झाला. स्थानापतीस गंध, अक्षता, पुष्पहार घालून विडा अवसर आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, गोपीराज शास्त्री सुकेणेकर, चिंतामन बाबा वैरागी या साधूसंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. जगावर आलेल्या कोविडरूपी महामारीचे संकट दूर होवो, अशी प्रार्थना यावेळी संतांनी केली.