ननाशीच्या सरपंचपदी दत्ता शिंगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:40 PM2020-01-11T23:40:19+5:302020-01-12T01:25:46+5:30

ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले.

Datta horns as the sarpanch of annihilation | ननाशीच्या सरपंचपदी दत्ता शिंगाडे

ननाशी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना उमेदवार.

Next

दिंडोरी : तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले.
पूर्वी ननाशी ग्रुप ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी २०११ पासून निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. अखेर ग्रामपंचायतीचे विभाजन झाले. विभाजन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.
ननाशी ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या सावरपाडा-रडतोंडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम सरपंच म्हणून छबीबाई महाले विजयी झाल्या आहेत. छबीबई महाले या ४२४ मते मिळवून विजयी झाल्या. यावेळी विजयी उमेदवार आणि समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळून जल्लोष केला.

Web Title: Datta horns as the sarpanch of annihilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.