शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

'दातार जेनिटिक्स लॅब'चा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 18:21 IST

विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील आदेशापर्यंत कोरोना स्वॅब टस्टींग करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईवर आक्षेप घेत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवरच आब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाारा दिला.

ठळक मुद्देदातार लॅबकडे आजवर केलेल्या सर्व चाचण्यांचे नमुने उपलब्ध ...तर जिल्हाधिकऱ्यांनी राजीनामा दयावा

नाशिक : शासकीय टेस्टींग लॅबच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आलेल्या दातार जेनेटिक्स लॅब प्रशाससाने जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटी रूपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेलीे कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करीत कंपनीने अहवालाची पुर्नतपासणी करण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे अहवालात विसंगती सापडली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दयावा असे थेट आव्हान दिले आहे.दातार जेनेटिक्स लॅबमधील अहवालाची शासकीय लॅबमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील आदेशापर्यंत कोरोना स्वॅब टस्टींग करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईवर आक्षेप घेत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवरच आब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाारा दिला. टेस्टींग बंद करण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही पुर्वसूचना किंवा संधी दिली नसल्याचा आरोपही करण्यात आला.या संदभार्त देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दातार लॅबने म्हटले आहे की, कारवाई करतांना शासकीय लॅबमधील पुर्नचाचणी तपशाील देण्यात आलेला नाही. ज्या प्रयोगशाळेत पुर्नचाचणी करण्यात आली ती प्रयोगशाळा एनएबीएल किंवा आयसीएमआर प्रमाणित होती का?असा सवालही उपस्थित केला आहे. दातार लॅबकडे आजवर केलेल्या सर्व चाचण्यांचे नमुने उपलब्ध असून जिल्हाधिकाऱ्यांनी हे नमुने एनआयव्ही या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेत पाठवावेत, येथील चाचणीत नमुन्यांमध्ये विसंगती सापडली नाही तर जिल्हाधिकऱ्यांनी राजीनामा दयावा अशीही मागणी केलेली आहे.दरम्यान, दातार लॅबमधील अहवाल जिल्हा प्रशासनाला अडचणीचे वाटत असल्याने यापुढे कोविडची चाचणी कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दातार जेनेटिक्सने पत्रकात म्हटले आ हे.लॅबने जिल्हाधिकाऱ्यावर ५०० कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर कार्यवाही करीत असल्याचे कळविण्यात आले आहे

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस